मुंबईत बाईक ऍम्ब्युलन्स ठरली “नवसंजीवनी’

वर्षभरात तीन हजार सहाशे रुग्णांना मिळाले जीवदान


पालघर, मेळघाट, पंढरपूर व गडचिरोली येथेही सेवा सुरु

मुंबई – घडाळ्याच्या काट्याप्रमाणे धावणा-या मुंबईतील चाकरमान्यांचे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अशा अपघातग्रस्तांवर उपचार करण्यासाठी तसेच गरोदर मातांसाठी मुंबईच्या रस्त्यावर धावणारी मोटार बाईक ऍम्ब्युलन्स नवसंजीवनी ठरली आहे. गेल्यावर्षभरात या बाईक ऍम्ब्युलन्सने सुमारे 3 हजार 600 रुग्णांना जीवदान दिले आहे.

वर्षभरात मुंबईत नव्याने 10, तर मेळघाट आणि पालघर येथे प्रत्येकी पाच अशा बाईक ऍम्ब्युलन्स राज्यात रुग्णांना सेवा देत आहेत. आज आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते पालघर येथे बाईक ऍम्ब्युलन्स सेवेचा शुभारंभ करण्यात आला. तर मुंबईत सुरु झालेल्या या सेवेला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षी दोन ऑगस्ट रोजी मुंबईत 10 बाईक ऍम्ब्युलन्सचा शुभारंभ करण्यात आला होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वर्षभराच्या कालावधीत विविध वैद्यकीय आपत्तकालीन परिस्थितीत 2 हजार 700 रुग्णांना उपचार देण्यात आले. तर अपघाताच्या 390 रुग्णांना वेळीच वैद्यकीय मदत देण्यात आली. 42 गरोदर मातांना या ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून तत्काळ उपचार करण्यात आले असून अन्य 442 रुग्णांवर वेळेवर उपचार झाल्याने वर्षभरात सुमारे 3 हजार 600 रुग्णांना जीवनदान या सेवेमुळे मिळाले आहे.

प्रायोगिक तत्वावर मुंबई येथे 10 बाईक ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून सेवेचा शुभारंभ करण्यात आला. त्याची आवश्‍यकता लक्षात घेता दोन महिन्यापूर्वी नव्याने आठ ऍम्ब्युलन्स मुंबईत सुरु करण्यात आल्या. आता एकूण 18 ऍम्ब्युलन्सच्या मदतीने रुग्णांना अत्यावश्‍यक सेवा दिली जात आहे. त्याचबरोबर राज्यातील दुर्गम भागात ही सेवा देण्यासाठी नव्याने 10 ऍम्ब्युलन्स सुरु करण्याचा निर्णय आरोग्य मंत्र्यांनी घेतला होता. त्यानुसार मेळघाट येथे पाच आणि पालघर येथे पाच अशा एकूण 10 ऍम्ब्युलन्स देण्यात आल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)