मुंबईत पेट्रोलने केली नव्वदी पार; दरवाढीचे सत्र कायम

नवी दिल्ली – मुंबईत पेट्रोलच्या दराने प्रथमच नव्वदी पार केली. महाराष्ट्रातील इतर काही शहरांमध्ये पेट्रोलने आधीच दराचा तो टप्पा ओलांडला आहे.

सोमवारी लिटरमागे पेट्रोल 11 पैशांनी तर डिझेल 5 पैशांनी महागले. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 82.72 रूपयांवर तर डिझेल 74.02 रूपयांवर पोहचले. जागतिक बाजारपेठेतील कच्च्या इंधनांचे दर वाढले आहेत. याशिवाय, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रूपयाच्या मुल्याचे मोठे अवमूल्यन झाले आहे. त्यामुळे भारतात ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून इंधन दरवाढीचे सत्र चालू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑगस्टच्या मध्यापासून आतापर्यंत लिटरमागे पेट्रोल 5.58 रूपयांनी तर डिझेल 5.30 रूपयांनी महागले आहे. इंधन दरांनी उच्चांकी पातळी गाठली असूनही ते स्वस्त करून सामान्य जनतेला दिलासा देण्याच्या मूडमध्ये अजूनही मोदी सरकार दिसत नाही. इंधन दर कमी करण्यासाठी त्यावरील करांत कपात करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मात्र, सरकारचा तूर्त करकपातीचा विचार नसल्याचेच संकेत मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)