मुंबईत ध्वजावंदना दरम्यान 8 जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई – मुंबईत शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान ध्वजावंदन आणि संचलन सुरु असताना परभणीहून आलेल्या एका कुटुंबातील आठजणांचा आत्मदहनाचा प्रयत्न मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला. परभणीतल्या खान कुटुंबातील हे आठ जण आहेत.

या कुटुंबीयांनी त्यांच्यासोबत रॉकेलही आणले होतं. पोलीस कोठडीत आपले पती समशेर खान यांचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला होता. पण, संबंधित पोलिसांचे अजूनही निलंबन करण्यात आले नसून, आपल्याला कोणतीही आर्थिक मदतही देण्यात आली नाही, अशी तक्रार करत समेशर यांची पत्नी अखिला बेगम, समशेर खान यांचे बंधू यासिन खान आणि त्यांच्या कुटुंबातल्याइतर सहा जणांनी शिवाजी पार्कवर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टाळला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)