मुंबई : अंगावर झाडाची फांदी पडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची आणखी एक घटना मुंबईत घडली आहे. सुखी लीलाजी असे मृत्यू महिलेचे नाव असून त्या 91 वर्षांच्या होत्या. मुंबईतील वाळकेश्वर भागातील बाणगंगा तलावाजवळ सकाळी सहा वाजता ही दुर्दैवी घटना घडली.

सुखी लीलाजी आज सकाळी वॉकसाठी बाणगंगा तलावाजवळ गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या अंगावर झाडाची फांदी कोसळली. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारांसाठी जी टी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिथे त्यांना मृत घोषित केले.

मागच्या महिन्यातच दादरमध्ये अंगावर झाड कोसळून एका 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर त्याआधी सहा महिन्यांपूर्वी चेंबूरमध्ये बस स्टॉपवर बसलेल्या महिलेचाही अशाच प्रकारे झाड अंगावर पडून मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)