मुंबईत चार मजली इमारत कोसळली, 40 जण अडकले

मुंबई – जे.जे. मार्ग परिसरात पार्क मोडिया स्ट्रीटवर असलेली चार मजली हुसेनिया इमारत कोसळली आहे. ही इमारत सुमारे 125 वर्षे जुनी होती. यामध्ये 9 कुटुंबे राहत होती.

ढिगाऱ्यातून 6 जणांना बाहेर काढण्यात आले असून जखमींना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली 35 ते 40 रहिवासी अडकल्याची भीती आहे. सध्या घटनास्थळी 10 अग्निशामन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून लोकांना वाचवण्याचे काम सुरू आहे. एनडीआरएफच्या टीमही दाखल झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)