मुंबई – गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मुंबईतील सायलेन्स झोनमध्ये म्हणजेच शांतता क्षेत्रात लाउडस्पीकर तसेच वाद्ये व फटाके वाजविण्यास पूर्णपणे बंदी असल्याचे सरकारने जाहिर केले आहे. शांतता क्षेत्र वगळता अन्यत्र परवाना घेउन सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत लाउडस्पीकर तसेच वाद्यांचा वापर तो देखील डेसिबलची मर्यादा पाळून करता येणार आहे.

गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात डीजे, ढोलताशांचा वापर केला जातो. मंडपात लाउडस्पीकर दिवसरात्र सुरू असतात. विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. राज्यात आवाजाच्या डेसिबलची मर्यादा ठरवून दिली आहे. याबाबत न्यायालयानेही वेळोवेळी निर्देश दिले आहेत.

मुंबई शहरात सायलेन्स झोन म्हणजेच शांतता क्षेत्र देखील वर्गीकृत करण्यात आली आहेत. यात हॉस्पीटल, शाळा, धार्मिक स्थळे, न्यायालये यांचा समावेश होतो. शांतता क्षेत्रात पूर्णवेळ कोणतेही वाद्य, लाउडस्पीकर लावण्यास किंवा फटाके फोडण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)