मुंबईत औषधाच्या विषबाधेतून विद्यार्थीनीचा मृत्यू

गोवंडी येथील पालिकेच्या शाळेतील प्रकार : 160 विद्यार्थी रुग्णालयात
मुंबई – शाळेत दिल्या जाणाऱ्या औषधातून विषबाधा झाल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. चांदणी साहिल शेख असे या मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर 160 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार मुंबईतील गोवंडी येथील महापालिकेच्या शाळेत घडला.

संजय नगरमधील उर्दू माध्यमाच्या पालिकेच्या शाळेत सोमवारी विद्यार्थ्यांना औषधे देण्यात आली होती. या औषधातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या विषबाधेमुळे चांदणी शेख हिचा मृत्यू झाला. तसेच अन्य विद्यार्थ्यांना उपचारासाठी घाटकोपर येथील सरकारी रूग्णालय आणि गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाळेतील विद्यार्थ्यांना कॅल्शियम, रक्तवाढीची औषधे दिली जात होती. मात्र या औषधांनी विद्यार्थ्यांना उलट्या आणि जळजळ होऊ लागली. हा त्रास अनेक विद्यार्थ्यांना होऊ लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या सर्व मुलांची बालरोगतज्ञांकडून तपासणी करुन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती बीएमसीच्या अधिका-यांनी दिली.

शाळेतल्या मधल्या सुट्टीत मुलांना देण्यात येणारे जेवण आणि गोळयांचे काही नमुने तपासणीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. मुलांना ज्या गोळया वाटण्यात आल्या त्या आर्यन आणि फॉलिक ऍसिडच्या गोळया होत्या. शिवाजीनगर पोलीस स्थानकात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या सर्व प्रकारामुळे गोवंडी परिसरात एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांना नेमकी कोणती औषधे दिली. या प्रकारात कोणी हलगर्जी केली, याबाबत आता चौकशी होत आहे.

याबाबत कार्यकारी आरोग्य अधिकारी पद्मजा केसकर म्हणाले, विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या गोळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच मुलीच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. या प्रकरणाची सखोल तपासणी करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ही माहिती मिळाल्यानंतर जमलेल्या पालकांनी शाळेविरोधात घोषणा देऊन शाळेत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन गर्दीला पांगविण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)