मुंबईत एलपीजी गॅसच्या स्पोटात मुलगी ठार

मुंबई: मुंबईतील कुर्ला उपनगरातील क्रांतीनगर भागात एलपीजी गॅस सिलिंडरचा एका चाळीत स्फोट होऊन त्यात एक चार वर्षांची मुलगी ठार झाल्याचा प्रकार घडला आहे. स्फोटामुळे त्या घरात आग लागण्याचाही प्रकार घडला. अर्ध्या तासात अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी आग आटोक्‍यात आणली. या आगीत अन्य दोन जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती धोक्‍याच्या बाहेर आहे असे सांगण्यात आले. गॅसचा हा स्फोट नेमका कशामुळे झाला याची चौकशी केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)