मुंबईत एटीएसकडून आठ बांगलादेशींना अटक

मुंबई – महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांच्या धरपकडीचे सत्र कायम आहे. राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) रविवारी रात्री मुंबईत अवैध वास्तव्याबद्दल आठ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. कांदिवली उपनगरातील लालजीपाडा भागात एटीएसने छापा टाकून त्यांना पकडले. वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहत असल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघांनी पॅन आणि आधार कार्ड मिळवल्याचेही स्पष्ट झाले.

आठही बांगलादेशी नागरिकांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 31 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याआधी पुण्याबरोबरच राज्यातील विविध भागांमधून काही बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आले. भिवंडी, अंबरनाथ, पनवेल आदी भागांतूनही बांगलादेशींना अवैध वास्तव्याबद्दल अटक करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)