मुंबईत एका गोविंदाचा मृत्यू; 60 जखमी

मुंबई – कृष्ण जन्माष्टमी उत्साहात झाल्यानंतर सोमवारी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीच्या जल्लोषाला चांगलाच रंग चढला. मात्र, थरावर थर रचताना जखमी झालेल्या एका गोविंदाचा मृत्यू झाल्याने उत्सवाला गालबोट लागले.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनूसार, मुंबईसह उपनगरात दहीहंडी फोडतांना 60 गोविंदा जखमी झाले आहेत. यापैकी 40 जणांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सायन हॉस्पिटलमधील अंकुश खंदारे या 27 वर्षीय गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

धारावीत थर रचताना फिट्‌स आल्याने गोविंदा खाली कोसळला होता. त्यानंतर त्याला ताबडतोब सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. इतर गोविंदांची प्रकृती स्थिर आहे तसेच 20 गोविंदांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. मुंबई भाजपाध्यक्ष आमदार ऍड.आशिष शेलार यांनी जखमी गोविंदाला 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

खार दांडा येथील गोविंदा पथकात सराव करताना काल 14 वर्षीय चिराग पटेकर हा गोविंदा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खार येथील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार सुरु आहेत. सकाळी आमदार शेलार यांनी जखमी चिरागच्या कुटुंबाची भेट घेऊन 1 लाखाची मदत केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)