मुंबईत उपमुख्याध्यापकाची आत्महत्या

मुंबई – उपमुख्याध्यापकाने शाळेच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील बाथरुममधून उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना मुंबईत घडली आहे. अंधेरी पश्‍चिममधील कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी या शाळेत शुक्रवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली.

राम कांबळे (वय 48 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून त्यांच्याकडे सुसाईड नोटही आढळली आहे. “माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरु नये,” असा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. या प्रकरणी डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राम कांबळे यांनी आत्महत्या केली, तेव्हा शाळेत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“आम्ही राम कांबळे यांच्याकडून सुसाईड नोट हस्तगत केली असून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. घरगुती कारणांमुळे कांबळे काही महिन्यांपासून तणावाखाली होते, असा संशय आहे. पण इतर बाजूंनीही तपास सुरु आहे, असे डीएन नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गनमे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)