मुंबई: मुंबईला गेले काही दिवस पावसाने झोडपल्यानंतर दोन दिवस काहीशी विश्रांती घेतली. मात्र येत्या 24 तासात ठाणे आणि रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मुंबईत दुपारी 1 वाजून 1  मिनिटांनी 5 मिटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याच समजतयं. या मोसमातील ही सर्वात मोठी हाय टाईड आहे तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

काल कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पावसाचा जोर मंदावला आहे. काहीशी उघडीप या भागांमध्ये बघायला मिळते. येत्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)