मुंबईतील विद्यार्थी आंदोलनाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम

पुणे – मुंबईत कुर्ल्याजवळ झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक मंगळवारी विस्कळीत झाली. पुण्याहून मुंबईला पोहोचणाऱ्या गाड्या सुमारे तीन तास तर, मुंबईहून पुण्याला येणाऱ्या गाड्या तब्बल चार तासांनी पोहोचल्या. त्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय झाली.

मुंबईहून पुण्याला निघालेल्या मुंबई-पुणे इंटरसिटी एक्‍स्प्रेस, डेक्‍कन एक्‍स्प्रेस, उद्यान एक्‍सप्रेस, कोयना एक्‍सप्रेस या गाड्या मंगळवारी दुपारी अडीच ते साडेचार दरम्यान पोहोचल्या; तर पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड, प्रगती एक्‍स्प्रेस आणि डेक्‍कन एक्‍स्प्रेस या गाड्या दुपारी दीडनंतर टप्प्याटप्प्याने मुंबईला पोहोचल्या. कुर्ल्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या अनेक मार्गांवरील सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. मुंबई-नाशिक मार्गावरील रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाल्याचे समजते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)