“आसरा’चा शुभारंभ : झोपडपट्टी पुनर्वसन कामकाजाचे डिजिटलायझेशन 
मुंबई: मुंबई महानगरपालिका हद्दीतील कुठल्या झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन सुरु आहे, त्यांची योजना काय आहे, कोणत्या सुविधा आहेत… याची माहिती आता एका क्‍लिकवर मिळणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाचे कामकाज आणि व्यवहाराचे आता संपूर्ण डिजिटलायझेशन झाले असून झोपडपट्टी पुनर्वसनाची इत्यंभूत माहिती मिळण्यासाठी राज्य सरकारने ‘आसरा’ हे मोबाईल ऍप्लीकेशन तयार केले आहे. झोपडपट्टीधारकांना “आसरा’चा मोठा उपयोग होणार असून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कामकाजात पारदर्शकता येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केलेल्या ‘आसरा’ या मोबाईल ऍप्लीकेशनचा आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर उपस्थित होते.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने डिजिटलायझेशनची चांगली सुरुवात केली आहे. झोपडपट्टीवासियांना विविध सोयी सुविधा, योजना यांची माहिती होण्याच्या दृष्टीने या “आसरा’ ऍपचा उपयोग नक्कीच होईल. या विभागाने त्यांच्या संपूर्ण कामकाज आणि व्यवहाराचे डिजिटलायझेशन करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)