मुंबईतील कंपन्यांमध्ये परकीयांना अधिक पगार

नवी दिल्ली  – व्यावसायिक क्षेत्रात लठ्ठ पगार देण्यासाठी अमेरिका आणि युरोपियन देश समजले जातात. मात्र मुंबईने विदेशी नागरिकांना लठ्ठ पगार देण्यासाठी अनेक देशांना मागे टाकले. सध्या विदेशी नागरिकांना लठ्ठ पगार घेण्यासाठी मुंबईला प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे. याचा अर्थ भारतात कुशल अधिकाऱ्याची गरज वाढली असल्याचे बोलले जाते.

एचएसबीसी बॅंक इंटरनॅशनल लिमिटेडने केलेल्या सर्वेनुसार मुंबईमध्ये काम करण्यासाठी येणाऱ्या विदेशी नागरिकांना मोठय़ा प्रमाणात वेतन देण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर विदेशी नागरिकांना देण्यात येणाऱ्या पगाराच्या आकडय़ांच्या तुलनेत मुंबईत दुप्पट वेतन देण्यात येते. आशियामध्ये काम करणाऱ्या विदेशी नागरिकांना सामान्यपणे आर्थिक रुपाने मोठय़ा प्रमाणात मदत करण्यात येते. या यादीमध्ये विदेशी नागरिकांना अधिक वेतन देण्याबाबत आशियातील शांघाय, बीजिंग, जकार्ता, हॉंगकॉंग, इंग्लडमधील लंडन यांचा समावेश आहे.

अमेरिका आणि ब्रिटनमधील आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ लोक अन्य देशांत जाण्यास अग्रक्रम देतात. युरोपातील तंत्रज्ञान क्षेत्राचे केंद्र समजले जाणारे डबलिन विदेशी नागरिकांना रोजगार देण्यासाठी पहिल्या पाच शहरांमध्ये आहे. मात्र सरासरी वेतनाच्या बाबतीत खूपच मागे आहे असे अहवालात म्हणण्यात आले.

युरोपियन देशांकडून स्वित्झर्लंडची राजधानी बर्नला अगोदर पहिले स्थान देण्यात येत होते. मात्र आता मानांकनात घट झाली आहे. याव्यतिरिक्त या देशातील ज्युरिच आणि जीनिव्हा ही दोन शहरे पहिल्या पाच शहरांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. या ठिकाणचे राहणीमान आणि जीवनमानाचा खर्च अधिक आहे, मात्र 77 टक्‍के विदेशींच्या मते आपल्या घरापेक्षा त्यांना तिथे अधिक सुरक्षित वाटते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)