मुंबईतल्या हुक्का पार्लर मधून होतेय ड्रग वाटप; खासदार सोमय्या यांचा आरोप

मुंबई – मुंबईतल्या विशेषत: मुलुंड उपनगरातील हुक्का पार्लर मध्ये ड्रग्जचे वितरण केले जात असल्याची तक्रार भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणीही त्यांनी मुंबई महापलिकेकडे केलेल्या निवेदनात केली आहे. मुलुंड एरियातील तीन हुक्का पार्लर मधून असा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत असे त्यांनी म्हटले आहे. हे प्रकार रोखण्यासाठी कठोर उपायोजना केल्या पाहिजेत अशी सुचनाही त्यांनी केली आहे. मुंबईत जसे बेकायदा पबवर कारवाई सुरू आहे तशीच कारवाई या हुक्का पार्लवर झाली पाहिजे असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)