मुंबईतल्या पावसात 13 जणांचा बळी

मुंबई -मुंबईसह उपनगरांना झोडपणाऱ्या पावसाचा क्रूर चेहरा आज उघड झाला आहे. काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये 13 जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

विक्रोळीमध्ये दरड कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला. तर ठाण्यामध्ये कालपासून 4 जण वाहून गेलेत. याशिवाय कालच्या पावसात नेमके किती बेपत्ता झाले आहेत, याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. दुसरीकडे पालघरमध्ये देखील पावसाने कहर केला असून, आतापर्यंत 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. डहाणू आणि बोईसर परिसरात मुसळधार पावसात 4 जण वाहून गेले. त्यापैकी 3 जणांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध सुरू आहे. तर आज सकाळी विनोद दळवी नावाचा तरूण जव्हार परिसरातल्या नाल्यातून वाहून गेला. नरू वळवी नावाचा मुलगा बोटीने सातपाटी येथे जात असताना बुडाला आहे.

दरम्यान, सायन परिसरात गाडीत गुदमरल्यामुळे एका वकिलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सायनमध्ये गांधी मार्केट परिसरात एक कार बंद पडली होती. त्या गाडीत प्रियन नावाचा 30 वर्षीय वकील बेशुद्धावस्थेत आढळला. गाडीमध्ये गुदमरुन त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.बुधवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास एका बंद गाडीत प्रियन बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)