मुंबईच्या जमनाबाई नरसी, फादर ऍग्नेल शाळांचे कांस्यपदक निश्‍चित

इलेव्हन स्पोर्टस आंतरशालेय राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप

इंदौर: महाराष्ट्राच्या मिहीका रोहीरा (भारताची 43 वी मानांकित खेळाडू) हिने विधी शाहसोबत खेळताना जमनाबाई नरसी संघाला इलेव्हन स्पोर्टस आंतरशालेय राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ओडीशाच्या केंद्रीय विद्यालय व चंदीगडच्या सेक्रेड हार्ट स्कूल संघाविरुद्ध मुलींच्या ज्युनियर गटात विजय मिळवून देत उपांत्यफेरीत स्थान मिळवून दिले.

जमनाबाई नरसीच्या विधी शाहने उपांत्यपुर्व फेरीत सेक्रेड हार्ट स्कूलच्या वसुंधरा सिंगला 3-1 (11-4, 11-6, 7-11, 11-4) असे नमविले.मिहीकाने देखील भाविका एस.ला 3-0(11-5, 11-3, 11-4) असे पराभूत केले. त्यामुळे संघाला सुरुवातीलाच 2-0 अशी आघाडी घेण्यात यश मिळवले.

दुहेरी गटात महाराष्ट्राच्या जोडीने वसुंधरा/ भाविका जोडीवर 11-7 असा गेम जिंकत चांगली सुरुवात केली. पुढचा गेम यांना 7-11 असा गमवावा लागला. यानंतर मिहीका/विधी जोडीने प्रतिस्पर्धी जोडीला कोणतीही संधी न देता 11-9 व 11-5 अशी चमक दाखवत शेवटच्या चार संघांमध्ये स्थान मिळवले. त्यापुर्वी मिहीका व विधी यांनी के.व्ही. ओडीशा संघाला 3-0 असे सरळ गेममध्ये नमविले.

मुलांच्या कॅडेट गटातील भारताचा दुसरा मानांकित खेळाडू गौरव पंचांगमने आपल्या अनुभवाचा फायदा उचलत फादर ऍग्नेल मल्टिपर्पोज स्कूलकडून खेळताना गुजरातच्या दिल्ली पब्लिक स्कूल (डीपीएस) 3-2 असे नमविले व संघाला उपांत्यफेरीत स्थान मिळवून दिले. गौरवने हरिश राजेशवर 3-0 असा विजय नोंदवत चांगली सुरुवात केली. पण, गौरवचा सहभागी नचिकेतो एम. याला श्‍लोक बजाजकडून 0-3 असे पराभूत व्हावे लागले. दुहेरी सामन्यात गौरव व नचिकेतो जोडीने श्‍लोक व हरिश जोडीला 3-0 असे नमवित 2-1 अशी आघाडी घेतली. पण, पुढच्या सामन्यात श्‍लोकने गौरववर 3-0 असा विजय मिळवत सामना 2-2 असा बरोबरीत आणला.निर्णायक सामन्यात फादर ऍग्नेलच्या नचिकेतोने हरिशवर 3-0 असा विजय मिळवून देत संघाचे उपांत्यफेरीतील स्थान निश्‍चित केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)