मुंबईचा कर्नाटकवर 88 धावांनी विजय

बंगळुरू – कर्णधार अजिंक्‍य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांची शानदार शतके आणि त्यांना गोलंदाजांनी दिलेली समयोचित साथ यामुळे मुंबईने कर्नाटक संघाचा 88 धावांनी दणदणीत पराभउव करीत विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील आगेकूच कायम राखली.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मुंबईने निर्धारित 50 षटकांत 5 बाद 362 धावांची मजल मारली. रहाणेने 150 चेंडूंत 13 चौकार व 3 षटकारांसह 148 धावा फठकवल्या. तर अय्यरने 5 चौकार व 8 षटकारांसह 110 धावा फटकावीत रहाणेच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी 216 धावांची भागीदारी केली.

-Ads-

त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी कर्नाटकचा डाव 45 षटकांत 274 धावांवर गुंडाळून आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. मयंक आगरवालने 66 धावा करताना कर्नाटककडून कडवी झुंज दिली. तसेच गौतमने 38 धावांची खेळी करताना त्याला साथ दिली. परंतु शम्स मुलानीने 71 धावांत 4 बळी घेत कर्नाटकचा डाव 274 धावांत गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला.

आजच्या अन्य सामन्यांत सुमिरन ओमाणकर व स्नेहल कौथनकर यांच्या फलंदाजीमुळे गोवा संघाने रेल्वे संघाचा 42 धावांनी पराभव केला. तसेच गुरकीरत मान व युवराज सिंगच्या फटकेबाजीमुळे पंजाबने विदर्भाचा 141 धावांनी पराभव करताना आगेकूच केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)