मुंबईकर हळूहळू पूर्वपदावर

मुंबई – मुसळधार पावसाने मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले होते, मात्र आता ते हळूहळू पर्वपदावर येत आहे. पश्‍चिम रेल्वे बऱ्यापैकी सुरळित होत आहे. विक्रोळीत भूस्खलन झाल्याने दोन तर दोन मजली इमारत कोसळून एक ठार झाला आहे. ठाण्यात मंगळवारी पाच जण वाहून गेल्याचेही वृत्त आहे. यातील दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत.

घाटकोपरच्या असल्फा विभागात रिलायन्स सबस्टेशनची भिंत घरावर कोसळून रामेश्वर तिवारी यांचा मृत्यू झाला. तर त्याचा मुलगा कृष्णा तिवारी आणि पत्नी मंजू तिवारी जखमी झाले आहेत. यामुळे मृतांचा एकूण आकडा पाच वर पोहोचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)