मुंबईकरांसाठी एसी लोकलच्या लवकरच दररोज 300 फेऱ्या

मुंबई – येथील पहिली एसी लोकल यशस्वी ठरल्यानंतर मुंबईकरांसाठी आता लवकरच एसी डबे असलेल्या 70 लोकलच्या दररोज 250 ते 300 फेऱ्या चालवल्या जातील’, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गोरेगाव येथे वक्तव्य केले. अंधेरी ते गोरेगावपर्यंतच्या हार्बर विस्तारीकरणाचा उद्घाटन सोहळा राजकीय वादामुळे चर्चेत राहिला. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचा एकही लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हता.

‘मुंबईत लवकरच 70 लोकलमध्ये प्रत्येकी तीन डबे एसी करण्यात येणार आहेत. यापैकी एक डबा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येईल. ही प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी होईल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)