मुंढे विद्यालयात सॅनिटरी नॅपकीनचे मोफत वाटप

जुन्नर-ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छता, वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल, त्याच्यातील संभ्रमाबाबत व सॅनेटरी नॅपकिनच्या वापराबाबत जाणीव जागृती करण्याच्या उद्देशाने डिसेंट फाउंडेशनच्या वतीने जुन्नर तालुक्‍यात ‘कळी उमलताना’ या नाविन्यपूर्ण उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ जुन्नर येथील माजी आमदार कै. कृष्णराव मुंढे विद्यालय येथे करण्यात आला, अशी माहिती डिसेंट फाउंडेशन चे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी दिली.
या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात डॉ. श्रद्धा भिडे, डॉ. कल्याणी पुंडे व डॉ. सविता फलके यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी 250 विद्यार्थिनींना सॅनेटरी नॅपकिन व रेड डॉट डिस्पोजेबल बॅगचे मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पोटकुले, भारती शेजवळ, रविंद्र पाटे, प्रकाश चौधरी, पल्लवी डोके, छाया बिडवई, बाळासाहेब काळे, पी. बी. जाधव, डिसेंन्ट फाऊंडेशनचे समन्वयक जितेंद्र लोखंडे यांसह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना खोसे यांनी केले तर वर्षा चौधरी यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)