मुंढेंच्या बदलीनंतर फटाके फोडणाऱ्या नाशिकच्या महापौर अडचणीत 

नाशिक – नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर आपल्या शासकीय बंगल्यासमोर फटाके फोडल्याने नाशिकच्या महापौर रंजना भानसी अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरुन तुकाराम मुंढे यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे. त्यांची नियुक्‍ती मुंबईतील नियोजन विभागातील सहसचिवपदी करण्यात आली आहे. बदलीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या समर्थकांनी “रामायण’ या महापौर बंगल्यासमोर फटाके फोडले होते.
याबाबत मुंढे समर्थकांनी महापौर रंजना भानसी यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुपारी 12 ते एक या वेळेत फटाके उडवत न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी नाशिककरांनी केली.

-Ads-

दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या 17 जणांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली. परवानगी न घेता आंदोलन करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
6 :heart: Love
1 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)