मुंडे साहेबांचं नाव घेऊन राजकारण करू नका ! ; भर सभेत कार्यकर्त्याने खासदारांना सुनावले! 

नगर: मुंडेंसाहेबांच्या नावावर राजकारण करू नका साहेब, 10 वर्षात तुम्ही आमच्याकडे फिरकलेही नाही, अशा शब्दांत मुंडे समर्थक भाजप कार्यकर्त्याने पंकजा मुंडे यांच्या समोर भर सभेतच खा. दिलीप गांधी यांना सुनावले. खा.गांधी यांनीही आक्रमक होत कोणाचं काय दुखतंय, ते आम्हाला माहितीय, असे म्हणत या कार्यकर्त्याला फटकारले. सारसनगर येथील चौक सभेत हा प्रकार घडला.

भाजपाच्या प्रचारासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे रविवारी सकाळपासून शहरात आहेत. त्यांच्या उपस्थितीत सारसनगर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत खा. गांधी यांचे भाषण सुरु होताच एका मुंड समर्थक कार्यकर्त्याने खासदारांना खडे बोल सुनावले. मुंडेंसाहेबांच्या नावावर राजकारण करू नका साहेब! मुंडेसाहेब समाजकारण करत होते. मुंडेसाहेबांनी कधीही राजकारण केलं नाही. तुम्ही 10 वर्षे खासदार होते. पण, एकदाही तुम्ही आमच्या सारसनगर भागात आला नाहीत आणि आता मते मागायला आलात का? असा सवालच या कार्यकर्त्याने केला.

पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकारामुळे संतापलेल्या खा. गांधी यांचाही पारा चढला. खासदारांनी विकास काय करायचा हे आम्हाला माहितीय ना, खासदारानं पालिकेच्या गटारीचं काम करायचं नसतं. आम्हाला माहितीय तुमचं कोणाचं काय दुखतंय ते’, अशा शब्दांत त्यांनी या कार्यकर्त्याला फटकारले. खा. गांधी आक्रमक झाल्यानंतरच इतर कार्यकत्यांनी त्या कार्यकर्त्याला शांत केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)