मुंगशीच्या सरपंचपदी रेश्‍मा थोरात

सुपा – पारनेर तालुक्‍यातील मुंगशीच्या सरपंचपदी रेश्‍मा भाऊसाहेब थोरात यांची बुधवार (दि.30) रोजी बिनविरोध निवड झाली.
तत्कालीन सरपंच मनिषा सतिश थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुमारे दोन वर्ष सरपंचपद रिक्त होते. शासकिय प्रक्रिया पार पडल्यानंतर बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात हि निवडणुक प्रक्रिया पार पडली. निवडणुक अधिकारी म्हणून वाडेगव्हाण मंडला धिकारी दत्ता गंधाडे यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेविका जपकर मॅडम यांनी सहाय्य केले. रेश्‍मा थोरात यांच्या नावाची सुचना अनिल बन्सी करपे यांनी मांडली. त्यास सर्व सदस्यांनी हात वर करुन मतदान केले. यावेळी उपसरपंच अनिल बन्सी करपे, ग्रामपंचायत सदस्या सुनिता भाऊसाहेब थोरात, गीता सुरेश करपे आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच थोरात म्हणाल्या, गावच्या विकासासाठी सदैव कटिबध्द राहणार असून सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात घेवून विविध विकासकामे केली जातील, तसेच गोरगरिब, गरजूंना तसेच महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार असल्याचे सरपंच थोरात यांनी सांगितले. या निवडीचे ग्रामस्थांनी गुलाल उधळत व फटाके वाजवून स्वागत केले.
यावेळी संजय थोरात, सुदाम थोरात, दादाभाऊ करपे, सतिष थोरात, वामनराव थोरात, भास्कर थोरात(सर), सुदाम दळवी(सर), बबनराव थोरात, छगन थोरात, बाळू थोरात, गिता करपे, सुनिता थोरात, मच्छिंद्र थोरात, दादाभाऊ थोरात, पांडुरंग शिंगोटे, सचिन थोरात, राजेंद्र थोरात, अशोक थोरात, मोहन साळवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)