मी 16 एप्रिलपासून बसणार उपोषणाला – प्रवीण तोगडिया

नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेतील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर प्रवीण तोगडिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मी आता विश्व हिंदू परिषदेत नसून सोमवारी 16 एप्रिलपासून उपोषणास बसणार, असे त्यांनी सांगितले आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांना शनिवारी मोठा धक्का बसला आहे. विहिंपच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रवीण तोगडिया यांच्या गटातील राघव रेड्डी आणि हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल निवृत्त न्या. विष्णू सदाशिव कोकजे यांच्यात लढत होती. यात कोकजे 131 मते मिळवून राघव रेड्डींचा पराभव केला. राघव रेड्डींना केवळ 60 मते मिळाली.

विश्व हिंदू परिषदेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून नव्या कार्यकारिणीत तोगडिया गटातील एकाही व्यक्तीला स्थान मिळू शकलेले नाही.यावर तोगडिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केवळ प्रवीण तोगडिया यांची उचलबांगडी करण्याच्या उद्देशानं 52 वर्षांनंतर पहिल्यांदाच विहिंपच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक घेण्यात आली होती, असे म्हटले जात आहे. या प्रयत्नात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यशदेखील मिळाले आहे.

52 वर्षांत प्रथमच विहिंपमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आल्यानं ही निवडणूक विशेष अशी ठरली. दरम्यान, निवडणुकीपूर्वीच विहिंपच्या मतदार यादीमध्ये 40 बोगस मतदार असल्याचा आरोप तोगडिया यांनी केला होता. दरम्यान, डिसेंबर 2017 मध्ये तोगडिया आणि रेड्डी यांच्या पदाचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर नवीन अध्यक्षांच्या निवडीसाठी 29 डिसेंबर 20017ला भुवनेश्वरमध्ये बैठकदेखील  झाली होती.  मात्र तोगडिया आणि त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घालत कोकजे यांच्या नावाला विरोध केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)