मी सावित्री…

अपर्णा कुलकर्णी

रोजसारखीच तर सकाळ .. आज काय वेगळं आहे ? खरं तर मी रुढ अर्थाने वटपौर्णिमेची पुजा मी करत नाही. म्हणजे हल्ली करत नाही. तरी कालपासून डोक्‍यात होतच सतत की उद्या वटपौर्णिमा आहे..!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जरीची साडी नेसून.. नटूनथटून वडाकडे निघालेल्या बायकांची लगबग पाहुन फ्रेश वाटत राहिलं… शेजारच्या चिमुरडीने विचारले काकु आज करवा चौथ आहे का ? तिला बिचारीला हिंदी सिनेमे पाहुन तेवढच माहीत होत ..

मला वाटत समाजात तीन गट असतात ..एक उच्चभ्रू , ज्यांना वडाची झाडे पुजावित की लावावित की तोडावित यांच्याशी काही देणंघेणं नसतं .दुसरे मध्यमवर्गीय , ज्यांना आपण खूपच मोडर्न आहोत हे दाखवण्याची हौस असते..इथे मध्यमवर्गाच्या आधी ‘ उच्च ‘ हा शब्द मी विसरले..तर हे लोक खुप हुशार आणि टेक्‍नोसाव्ही असतात ..मग वडपूजेबद्दल सकाळपासूनच सोशल मीडियावर जोक्‍स सुरू होतात . तिसरा गट म्हणजे आपण हे का करतोय ? ह्याला लॉजिक काय आहे असले फालतू प्रश्न यांना पडत नाहीत..

 

मी नेमकी कोणत्या गटात मोडते असा विचार मनात आला..खरं तर या पूजे मागची संकल्पना कालबाह्य झाली आहे..वडाची फांदी आणून किंवा चित्र लावून पूजा करणाऱ्यांची तर मला कीव येते !

पण यातलं अवडम्बर वगळता ही किती छान कल्पना आहे ! जसे आपण हल्ली वेगळे वेगळे डेज साजरे करतो तसाच तर हा दिवस !!

माझ्यासाठी तू खूप स्पेशल आहेस..माझ्यासाठी तुझं असणं आणि निरोगी असणं खूपच महत्वाचे आहे ..आणि त्यासाठी माझ्या नवऱ्याला सुखी कर ..शतायुषी कर म्हणून प्रार्थना करायची…असं एकमेकांसठी काही बाही केल्याने अंडरस्टॅंडींग वाढत असावं असं तीस वर्षां नंतर मी म्हणूच शकते.

आजही मी अशी छान साडी नेसून मी आजच्या दिवशी देवीची ओटी भरते तेंव्हा तो खुष असतो..आणि त्याने खूष रहावं म्हणून तर हे सगळं !

आता बायकांनीच का ?? पुरुष का नाही करत ?? हे असले काही बाही प्रश्न मला विचारु नयेत..कारण स्त्री पुरुष समानतेच्या पुढे जाउन आम्ही माणूस म्हणून एकमेकांना समजलोय त्यामुळे अमुक कामे बाईची किंवा पुरुषाची अशी विभागणी नाही…तेंव्हा आजच्या दिवशी एकमेकांविषयी कृतार्थता व्यक्त करायची..पौर्णिमेच्या चंद्रासारखे पुर्ण आणि कृतार्थ जीवन असावे अशी इच्छा करायची..

वटवृक्षाप्रमाणे आपल्याही संसाराची पाळे मुळे खोल रुजावित असा प्रयत्न करायचा..प्रेमाच्या कच्च्या धाग्यानी एकमेकाना बांधुन ठेवायच..बस अजून काय ??तशी आजची मी ही सावित्रीच ! नवऱ्यावर प्रेम करणारी , निष्ठा असणारी , आणि त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणारी !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)