मी विजेता होणारच : कणकवलीकर

शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे नगरी

सातारा – आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सतत नावीन्यांची आस घेऊन स्वतःला प्रश्‍न विचारायला शिका. असे मत मी विजेता होणारच फेम डॉ. उमेश कणकवलीकर यांनी व्यक्त केले. ग. दि. माडगूळकर सभा मंडपात ग्रंथमहोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात’ चला घडूया ‘ च्या निमित्ताने ते बोलत होते. ते म्हणाले माणसांनी सकारात्मक उर्जा ठेवून काम करायला सुरवात केल्यावर आपोआपच यशाची दारे खुली होतात, मात्र त्यासाठी सातत्याने सराव करावा लागतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माणसाने आपला इतिहास तपासून मग पुढच्या भविष्याचा विचार करायला हवा मुलांनी स्वतःला प्रश्‍न विचारायला हवेत त्याची उत्तरे जाऊ दे मग बघू असे म्हणण्यापेक्षा ती शोधण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा. उगाच सोशल मिडियाच्या नादाला न लागता स्वतःच्या बांधणीचा संस्कारातून पुढे आला पाहिजे. यासाठी सुजाणं पालकांनी प्रचंड समाजभानं राखणे आवश्‍यक असल्याची गरज कणकवलीकर यांनी प्रतिपादीत केली.

आपल्या दीड तासाच्या कार्यक्रमात डॉ. उमेश यांनी मुलांना अनेक गोष्टी व किश्‍श्‍यांचे कथन केले. कार्यवाह शिरीष चिटणीसं व डॉ. राजेंद्र माने यांनी कणकवलीकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ. प्रदीप कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सकाळी प्रचंड गारठा असल्याने सकाळी साडेआठचा कार्यक्रम एक तास उशीरा सुरू झाली. सभामंडपातील रिकाम्या खुर्चा पाहून प्रमुख पाहुण्यांनी संयोजकांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)