“मी लष्कर प्रमुख आहे, पण क्रिकेटपटू व्हायचे होते’

नवज्योत सिंग सिद्धू आणि पाक लष्कर प्रमुखांमध्ये सुसंवाद

नवी दिल्ली – पाकिस्तानचे नवनियुक्‍त पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलेल्या पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी आलिंगन दिले. मात्र त्यांच्या या कृतीवरून सिद्धू यांच्यावर टीका व्हायला लागली आहे.

समारंभामध्ये तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित असल्याने त्यांनी ओळख करून घेणे आवश्‍यकच होते. सिद्धू पहिल्याच रांगेत बसलेले असल्याने बाजवा स्वतः उठून आपल्याकडे आले होते. त्यांच्याशी भेट टाळण्याचे काहीच कारणही नव्हते, अशा शब्दात सिद्धू यांनी या भेटीचे समर्थनच केले आहे.

“मी लष्कर प्रमुख आहे, पण मला क्रिकेटपटू व्हायचे होते.’ असे जनरल बाजवा यांनी बोलताना सांगितले. आपल्याला शांतताच हवी आहे, असेही बाजवा बोलताना म्हणाले असल्याचे सिद्धू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी यापूर्वीही शांतता आणि भारताबरोबरच्या चर्चेचा आग्रह धरला होता. मात्र या आवाहनाला भारताकडून सकारात्मक प्रतिसाद दिला गेला नाही, असा पाकिस्तानचा दावा आहे.

मात्र जनरल बाजवा यांच्याबरोबरच्या या छोट्याशा भेटीदरम्यान बाजवा यांचा शांततेबाबतचा हेतू स्पष्ट असल्याचे जाणवल्याचेही सिद्धू यांनी सांगितले.

गुरु नानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त करतारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिबमध्ये भाविकांना प्रवेश दिला जाईल. यापेक्षाही अधिक चांगल्या गोष्टी पाकिस्तान लष्कराकडून केल्या जातील, असेही बाजवा म्हणाले. हे एक स्वप्न सत्य होत असल्यासारखेच भासत आहे, अशा शब्दात सिद्धू यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्‍त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)