“मी परत येईल, तेव्हा सभागृहाचा सदस्य होऊनच येईल” पवारांनी जाग्या केल्या आठवणी

पुणे: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पुण्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. पुण्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांची एक ‘राजकारणी’ म्हणून कशाप्रकारे जडण-घडण झाली याच्याबाबतचे अनेक किस्से पवार यांनी आज पुणेकरांसमोर मोकळेपणाने मांडले. यावेळी बोलताना त्यांनी ‘पुणेकरांसाठी एव्हडं केलं मात्र पुणेकरांनी कधीच मेहरबानी दाखवली नाही.’ अशी कोपरखळी देखील पुणेकरांना मारली.

पेपर लीफ या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांची “आठवणीतील पुणे” याविषयावर मुलाखत घेण्यात आली. यावेळी शरद पवार यांनी विधिमंडळातील एक आठवण सांगितली. “एकदा विधिमंडळ पाहण्यासाठी गेलो, तेव्हा गॅलरीत बसून आचार्य अत्रेंचे भाषण ऐकत होतो. तिथे पायावर पाय ठेवून बसण्याला बंदी होती. मात्र ती चूक मी दोनदा केल्याने तेथून मला बाहेर काढण्यात आले. त्यावर संबंधित सुरक्षारक्षकावर रागावून मी म्हणालो, ‘मी परत येईल, तेव्हा सभागृहाचा सदस्य म्हणूनच येईल’ ”

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
289 :thumbsup:
150 :heart:
1 :joy:
163 :heart_eyes:
330 :blush:
5 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)