मी पत्रकार परिषदांना घाबरत नव्हतो – मनमोहन सिंह

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर मी नेहमीच पत्रकार परिषदांना न घाबरता सामोरे गेलेलो आहे, असे म्हणत मनमोहन सिंहांनी मोदींना टोला लगावला. चेंजिंग इंडिया’या कार्यक्रमात मनमोहन सिंह सहभागी झाले होते. लोक मला अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर म्हणतात, पण मी अॅक्सिडेंटल फायनान्स मिनिस्टरही होतो, असेही त्यांनी सांगितले.

मनमोहन सिंह म्हणाले कि, केंद्र सरकारने आरबीआयच्या सहकार्याने काम केले पाहिजे. तसेच दोन्ही संस्थांनी समजंस्य पद्धतीने समस्येवर उपाय शोधायला पाहिजे. मी अशी अपेक्षा करतो की आरबीआय आणि केंद्र सरकार यातून मार्ग काढतील, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)