मी नाही म्हटले, तरी त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला- शरद पवार

 निवडणुकीमध्ये आपण भाजपबरोबर जायचं नाही हा निर्णय मी त्यांना सांगितला. मी सांगितल्याच्या नंतर आणखी कुणी सांगायची गरज होती असं वाटत नाही

अहमदनगर: महापौर पदाच्या निवडणुकीत नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका देखील होत आहे. एकीकडे पक्ष्याचे अध्यक्ष शरद पवार विरोधकांना भाजप विरोधात एकत्र करत आहेत. तर दुसरीकडे त्यांचाच पक्ष भाजपाला पाठिंबा देत आहे.

दरम्यान या प्रकरणावर बोलताना शरद पवार म्हणाले, अहमदनगरच्या महापौरपदाच्या निवडणुकीसंदर्भात घडामोडींबाबत मी माझ्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रवादीच्या राज्याच्या अध्यक्षांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की अशा प्रकारची आघाडी आपण करायची नाही. भाजपाबरोबर जायचं नाही. त्यानंतर ही नगरमधली मंडळी व इथले आमदार मला भेटायला आले. त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं व या निवडणुकीमध्ये आपण बीजेपीबरोबर जायचं नाही हा निर्णय मी त्यांना सांगितला. मी सांगितल्याच्या नंतर आणखी कुणी सांगायची गरज होती असं वाटत नाही. तरीही मी सांगितल्यावरही हा निर्णय घेण्यात आला.

आमच्या पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षांनी ताबडतोब मला कळवले की त्यांनी या लोकांना नोटीसा दिल्या आहेत. दहा-बारा दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यांच्याकडून एक्सप्लनेशन मागवले आहे. या सगळ्यांकडून माहिती आल्यावर 4 किंवा 5 जानेवारीला आमच्या बैठकीमध्ये यासंबंधी स्वच्छ निर्णय होईल. स्पष्ट सूचनेनंतरही विसंगत निर्णय घेतला गेला असेल तर ती गोष्ट स्वीकारार्ह नाही. त्याची नोंद पक्षाने गांभीर्याने घेतली आहे व कारवाई गांभीर्यानेच केली जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
161 :thumbsup:
6 :heart:
21 :joy:
7 :heart_eyes:
0 :blush:
3 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)