‘मी दगडात नाही, मी देवळात नाही, मी झाडात आहे’

पर्यावरणपूरक गणेशोत्सवात नव्या लातूर पॅटर्नची सुरुवात

लातूर – सर्वत्र मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव सादरा केला जात आहे. तर या गणेशोत्सवात सध्या सर्वत्र पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्थापनेला प्राधान्य दिले जात आहे. असाच एक आगळा वेगळा पर्यावरणपूरक गणेशात्सव लातूर शहरात साजरा केला जात आहे. ‘मी दगडात नाही, मी देवळात नाही, मी झाडात आहे’, असा संदेश आपल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवात देत लातुरच्या वसुंधरा प्रतिष्ठानकडून एका नव्या लातूर पॅटर्नची सुरुवात करण्यात आली आहे. वसुंधरा प्रतिष्ठानने पर्यावरण रक्षक गणेश उत्सवाच्या माध्यमातून वृक्षाला गणपतीचे रूप दिले आहे. झाडे लावू झाडे जगवू असा संदेश या माध्यमातून देण्यात येत आहे.

मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी एक एक वृक्ष लावून जोपासणे गरजेचे आहे, यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन या गणेश उत्सवाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. वृक्षांना असलेले महत्व तसेच वृक्षांचे जतन करूनच आपण दुष्काळमुक्त बोवू शकू असा संदेश मंडळाकडून दिला जात आहे. हा आगळा वेगळा गणेश उत्सव पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. याशिवाय वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने या गणेश उत्सव काळात ‘एक गणेश मंडळ – पाच वृक्ष’ हा उपक्रम राबवून प्रत्येक गणेश मंडळास पाच वृक्ष मोफत देऊन बाप्पाच्या नावे जोपासण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या उपक्रमाला सुरवात करण्यात आला आहे. मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)