मी डास बोलतोय…

सचिन नागपूरकर 

नमस्कार, 
साला एक मच्छर आदमी को …….बना देता है. 
साला एक मच्छर…….. 
आवडली ना माझी डायलर टोन. 
हॅलो…मी डास बोलतोय. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पूर्ण नाव सांगण्याची गरज नाही. फक्त डास म्हटले तरी चालेल. इतका वचक/ दरारा/ओळख आहे आमची.जसे तुमच्या मनुष्य प्राण्यांमध्ये विविध जाती/ जमाती/ उपजाती आहेत,तशाच प्रकारच्या विविध जाती/जमाती/ उपजाती, धर्म आमच्यामध्ये आहेत.अनेक जाती/ उपजाती/ जमाती असताना आम्ही आमचे आडनाव बदललेले नाही. ते म्हणजे डास.. हो डासच… मलेरियाचा असो नाहीतर डेंगूचा नाहीतर चिकनगुणीयाचा आम्ही सगळे डासच. गेली अनेक दशके मी व माझ्या डास मंडळींनी भारतासह संपूर्ण जगात आमची दहशत/ दरारा निर्माण केला आहे.याचा खास अभिमान आम्हा डास मंडळींना आहे.आमची ही दहशत..आमची साथ पसरवण्यात आपल्या मनुष्य जातीचा खूप मोठा हातभार आहे.आणि आम्हाला त्याची जाण आहे. आमची पैदास वाढविण्यासाठी लागणारे पोषक वातावरण,योग्य ती दलदल, घाण व अस्वच्छता या सारख्या अनेक सवलती मानव जातीने आम्हाला देऊ केल्या आहेत,त्याचा मी तमाम डास परीवारातरर्फे ऋणी आहे.
आमच्या डास परिवारातील सर्वात जुनी, प्रभावी मारा करणारी,चिवट.

सर्व जनसामान्यांमध्ये प्रसिद्ध असणारी खेळाडू ऍनाफिलीस मादी व त्यामुळे होणारा जगप्रसिद्ध,सर्व सामान्य जनतेमधील, डॉकटरांकडे भरपूर रूग्ण घेऊन येणारा मलेरिया हा आजार. या मलेरीया आजाराचा बिमोड करण्यासाठी केंद्र सरकार मलेरीया उच्चाटन कार्यक्रम गेली 5 ते 6 दशके झाले चालवत आहे.इतकी प्रभावी अशी ती आमची मादी तिचा बंदोबस्त करण्यासाठी सरकार करोडो रूपये खर्च करते. हे ऐकल्यावर आम्हाला त्या मादीचा खरोखरच अभिमान वाटतो. शेवटी याचे सर्व श्रेय आपल्या सर्वांनाच आहे.प्रत्येक जिल्हात एक क्‍लास वन अधिकारी व सोबत काम करणारी 20 ते 30 मंडळी आमचा बिमोड करण्यासाठी काम करतात,त्यांना ते काम व त्याजोगे मिळणारे मानधन आमच्या डास मंडळींमुळेच मिळते हे समजल्यावर आमची मान उंचावते. याचे श्रेय आपण आमच्या वाढीसाठी निर्माण केलेल्या दलदलीला अस्वच्छतेलाच आहे.

आत्तापर्यंत बऱ्याच वेळा आमच्यामुळे देशावर साथीचे आजार पसरले,अनेक लोक मृत्युमुखी पडले,आर्थिक नुकसान झाले. हे ऐकून मन सुन्न होते. पण काय करणार आमची पैदास वाढविण्यासाठी लागणारे पोषक वातावरण तयारच झाले नाही तर आमचा जन्म होणार नाही.पण जर का आमचा जन्म झाला तर पोटा पाण्यासाठी आम्हाला आमचे चावण्याचे काम करावेच लागणार.

तसाच एक प्रभावी मारा करणारा,भेदक,नकोनकोसा वाटणारा,हाड मोड त्रास देणारा डॉक्‍टरांनासुध्दा विचार करायला लावणारा महिनोन महिने त्रास देणारा आमचा एडीसराव डास.अचूक मारा,भेदक क्षमता असणारा गेली आठ दहा वर्षे आपले प्रभुत्व सिद्ध करणारा हा एडीसराव डास, चिकनगुणीयाचा व डेंगूचा चा डास या नावाने आजार पसरविणाऱ्या या डासाच्या समावेशामुळे आमच्या डास परिवारामध्ये नवीन उमेद,जोश निर्माण झाला आहे. परवा पार पडलेल्या वार्षिक सभेमध्ये सन 2018- 19 साठी एडीसराव यांची अध्यक्षपदी सर्वांनुमते निवड करण्यात आली. मागील वर्षांतील एकूण कार्यपद्धतीचा विचार करण्यात आला. एकूण रूग्णांना झालेली लागन, मृत्युदर,आर्थिक नुकसान,औषध विक्री मध्ये झालेली उलाढाल या सर्व गोष्टीचा विचार व पुढील वर्षा साठीचे अंदाज पत्रक तयार करण्यात आले.

आमच्या डास परीवारामुळे होणाऱ्या मलेरीया/डेंगू/ चिकनगुणीया अशा आजारांबद्‌ल आपण नेहमीच बोलताना दिसता,मात्र त्यासाठी योग्य ती उपाय योजना करताना कमी पडता.तुमच्यामध्ये असणारा श्रीमंत वर्ग नेहमी स्वतः पुरती काळजी घेतो.गरीब कष्टकरी,सभोवताली अस्वच्छता असताना छोट्या जागी राहणारा मात्र आमचा नेहमीच शिकार होतो.वाईट वाटतं..पण काय करणार…….

यावर उपाय सुचविणे आम्हाला शक्‍य नाही परंतु आपण जर योग्य ती उपाय योजना तयार करून आमलात आणली तर आमची पैदास होणार नाही. गरीब श्रीमंत,जातीभेद असा भेदभाव आमच्यामध्ये नाही म्हणून आम्ही नवीन एक आमचा सहकारी योग्य ते प्रशिक्षण पूर्ण करून एसीद्वारे, विभागामध्ये घुसून मारा करण्यासाठी सज्ज झाला आहे. चला ठेवतो फोन. सहा वाजत आले आहेत. कामावर जायची वेळ झाली आहे.

आज माझी डूट्टी जेष्ठ नागरिक कट्यावर आहे. जेवढे काही चावे घेता येतील तेवढे घेऊन येतो. एकच सांगतो आमचा जन्म पैदास तुमच्या हातात आहे. आपला परीसर स्वच्छ ठेवा. कचरा विल्लेवाट नीट करा, कोठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. नाही तर आपली भेट वारंवार होणार हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)