‘मी टू’ वर बोलू काही…

सोशल मीडियाच्या ताकदीची अनुभूती आपण सर्वचजण सध्या ‘मी टू’ चळवळीच्या माध्यमातून घेत आहोत. एलिसा मिलानो या अमेरिकन अभिनेत्रीने मध्ये सुरु केलेला ‘#MeToo’ हा हॅशटॅग सध्या जगभरातील महिलांवर झालेल्या अशा लैंगिक अत्याचारांना वाचा फोडत आहे. भारतामध्येही ‘मी टू’ चळवळीने जोर धरला असून आतापर्यंत एका केंद्रीय मंत्र्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. ‘मी टू’ मुव्हमेंटची दुसरी बाजू पाहायची झाल्यास या हॅशटॅगद्वारे सामान्य तरुणी अथवा महिलांनी आवाज उठवल्याचे चित्र मात्र फारसे दिसले नाहीये. या ‘मी टू’ मोहिमेबाबत सामान्यांना काय वाटतंय? हे जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. म्हणूनच ‘मी टू’ बाबत कॉलेज तरुण-तरुणींच्या मनाचा वेध घेण्याचा हा एक प्रयत्न…

प्रियंका गाडे : सामान्य तरुणी आवाज उठवत नाहीत…

आज प्रत्येक सर्वसाधारण माणसांन पर्यंत मी टू मोहीम पोहचली आहे. मात्र आजही आपला समाज एवढा प्रगत झाला नाही की, त्यांच्या कडुन मुलींना समजून घेतले जाईल, सर्वसाधारण कुटूंबातील मुली आजही त्यांच्या बद्दल असे काही घडले की सांगण्यास घाबरतात आणि जर सांगितले तर समाजाचा त्यांच्याकडे बघण्याच्या दृष्टीकोन बदलेल याची भीती त्यांना वाटत असते. अनेकदा मुली शांत बसतात. अशा वेळी त्या #मीटू बाबत खुलेपणाने बोलू शकत नाहीत.

अमृता वाडेकर : अत्याचारांना वाचा फोडायलाच हवी…

मी टू मोहीममुळे कुठेतरी समाजातील लेंगिक शोषणाला आळा बसणार आहे मात्र मुलींनी लेंगिक शोषण झाल्यास कुठल्याही प्रकारच्या विचार न करता तसेच रडत न बसता या विरोधात धीटपणे आवाज उठवायला हवा, मुलींनी रडत न बसता अशा कृत्यांबाबत उघडपणे पुढे यायला हवे. मुलींना आपला स्वाभिमान आणि समाजात आपले स्थान तेव्हाच टिकवून ठेवता येईल जेव्हा त्या आपल्यावर झालेल्या कुठल्याही प्रकारच्या अत्याचाराविरोधात खंबीरपणे आवाज उठवतील.

अमेय ताकसांडे : चळवळ चांगली पण भूतकाळातील घटनांची सत्यता कशी पडताळणार?

मीटू हा विषय सध्या जास्त जोर धरत आहे मला त्याबद्दल फक्त एवढेच बोलावेसे वाटते कि जे आरोपी सिद्ध झाले त्यांना शिक्षा व्हायला हवी पण काही स्त्रियांनी – वर्षा आधी झालेल्या घटना उघडकीस आणल्या त्यावर माझे मत आहे कि अत्याचार झाल्या काही काळातच कार्यवाही का नाही केली? इतका उशीर का? बर कारण त्यामुळे अत्याचार उघडकीस येत नाही आणि अत्याचार करणाऱ्याला सुद्धा काही पश्‍चाताप होत नाही पण याचाच उलट प्रभाव सुद्धा पडू शकतो. म्हणजे कोणती स्त्री त्याचा गैरवापर सुद्धा करू शकते.

शेखर वाघ : मीटूचा गैर वापर होतोय…

#मीटू ही भूतकाळात व आत्ता ज्यांच्यावर अत्याचार झाले किंवा होतात, त्यांना आवाज देण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खूप महत्त्वाची चळवळ आहे, परंतु याचा फायदा काही चुकीचे लोक घेताना दिसतात. मागील काही केसेस मध्ये दिसून आले की आधी दोघांच्या संमतीने असलेले संबंध आणि नंतर विभक्त झालेले किंवा जुनी वैर असली तर त्याला मीटू चे स्वरूप देऊन बदनाम केले जात आहे.

– प्रीती फुलबांधे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
47 :thumbsup:
3 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)