#मी टू मोहिमेवर राहुल गांधींनी मांडली भूमिका

नवी दिल्ली – देशभरात विविध क्षेत्रातील महिलांनी आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात खुलेपणाने बोलण्यासाठी “मी टू’ ची मोहीम सुरू केली आहे. त्या मोहिमेला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आज पाठिंबा दर्शविला आहे.

याबाबतीत राहून गांधी ट्विट केले की, आता खरे बोलण्याची वेळ आली आहे. बदल घडवण्यासाठी मोठ्याने आणि ठळकपणाने खरे बोलावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. महिलांना सन्मान देण्यास प्रत्येकानेच शिकले पाहिजे, असेही ते म्हणाले.

-Ads-

राफेलप्रकरणी गुरुवारी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना केंद्रीय मंत्री एम. जे अकबर यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांबाबत विचारले असता राहुल गांधींनी हा एका गंभीर मुद्दा असून त्याच्यावर वेगळी पत्रकार परिषद घेईल, असे सांगितले होते. तथापी त्यांनी या मंत्र्याचा आपल्या ट्विटर संदेशात उल्लेख केलेला नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)