“मी टू’ प्रकरणी सुभाष घई यांना क्‍लिन चिट 

“मी टू’ चळवळ अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर वादानंतर सोशल मीडियावर प्रबळतेने पुढे सरसावताना दिसली. या चळवळीतून कला विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांची नावे समोर आली. यात अडकलेले मोठे नाव म्हणजे सुभाष घई. सुभाष घईंविरोधात असभ्य वर्तन केल्याबद्दल अभिनेत्री केट शर्मा हिने तक्रार दाखल केली होती. आता याप्रकरणी सुभाष घईंना मुंबई पोलिसांनी क्‍लीन चीट दिली आहे.

अभिनेत्री केट शर्मा हिने तक्रार मागे घेतील असल्याने पोलिसांनी ही तक्रार रद्द केली आहे. त्यामुळे, याप्रकरणातून घईंना अखेर क्‍लीन चीट देण्यात आली आहे. सुभाष घईंविरोधात वर्सोवा पोलिसात केट शर्माने तक्रार दाखल केली होती. मला 6 ऑगस्टला घई यांनी त्यांच्या घरी भेटण्यासाठी बोलवले होते. जेव्हा मी त्यांच्या घरी गेले, तेव्हा तेथे त्यांच्याशिवाय 5 ते 6 लोक होते. त्यावेळी घईंने मला त्यांचा मसाज करुन देण्यास सांगितले. मसाज करुन दिल्यानंतर मी माझे हात धुवायला गेले असता, ते माझ्या मागेच येत होते. त्यांनी मला त्यांच्या बेडरुममध्ये बोलवले आणि मला किस करण्याचा प्रयत्न केला, असे तिने या तक्रारीत म्हटले होते.

-Ads-

———————–


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)