#मी टू चळवळीवर अखेर बिग बींनी सोडले मौन

तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपांनी सिनेसृष्टी चांगलीच ढवळून निघाली आहे. यानंतर अनेकांनी तनुश्रीची पाठराखण केली तर काहींनी हा केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हंटले आहे. या विषयावर बिग बी मात्र मौन बाळगून होते. अखेर आज याप्रकरणी अमिताभ बच्चन यांनीही भाष्य केले आहे.

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या एका मुलाखतीत अमिताभ बच्चन म्हणाले कि, कोणत्याही महिलेसोबत गैरवर्तन होऊ नये. विशेषतः कामाच्या ठिकाणी. परंतु, गैरवर्तन झाले तरी त्या महिलेने त्वरित आपल्या वरिष्ठांकडे तक्रार करावी. जेणेकरून त्यावर कारवाई करता येईल. ते पुढे म्हणाले, आपल्या समाजात लहान  मुले, स्त्रिया आणि कमकुवत वर्गावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले जातात. या वर्गाला विशेष संरक्षणाची गरज आहे. आज महिला वेगवेगळ्या क्षेत्रात भरारी घेत आहेत. परंतु, त्यांना कामाच्या ठिकाणी संरक्षित वातावरण देऊ शकलो नाही तर यात आपला दोष आहे, असेही अमिताभ बच्चन म्हणाले.

दरम्यान, संपूर्ण मुलाखतीती अमिताभ बच्चन यांनी कोठेही नाना पाटेकर अथवा तनुश्री दत्ताची पाठराखण न करता त्यावर बोलणे सोयीस्कररित्या टाळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)