#मी टू : गैरवतणूकीचे आरोप असलेले ४८ कर्मचाऱ्यांची गुगलमधून हकालपट्टी 

‘मी टू’च्या वादळाने जगभरात थैमान घातले असून यामधून गुगलची कंपनीही सुटू शकलेली नाही. याबाबतची माहिती खुद्द गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिली आहे. यानुसार लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे गुगलच्या तब्बल ४८ कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले आहे. यामध्ये १३ वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही नावे सामील आहेत.

सुंदर पिचई यांनी  कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आश्वस्त करण्यासाठी एका मेल केला आहे. यात म्हंटले आहे की, गेल्या दोन वर्षात लैंगिक शोषणाचे आरोप लागलेल्या ४८ कर्मचाऱ्यांची कंपनीने हक्कलपट्टी केली आहे. यामध्ये अँड्रॉईडचा निर्माता अँडी रुबिन यांचाही समावेश आहे. रुबिन यांना कंपनीने ९० दशलक्ष डॉलरची भरपाई देत हाकलले आहे. गुगल आपल्या धोरणांमध्ये बदल करत असून कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे पिचाई यांनी म्हंटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, अँडी रुबिन यांचावर एका महिला सहकाऱ्याने गैरवर्तनाचे आरोप लावले होते. मात्र रुबीन यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)