#मी टू : ‘एम जे अकबर यांनी माझ्यावर बलात्कार केला होता’; महिला पत्रकाराचा आरोप 

नवी दिल्ली – मी टू कॅम्पेनअंतर्गत अनेक महिलांनी एम जे अकबर यांच्यावर आरोप लावले आहेत. आता आणखी एका महिला पत्रकाराने त्यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप लावला आहे. पल्लवी गोगई असे त्या महिला पत्रकाराचे नाव आहे. सध्या पल्लवी अमेरिकेत वास्तव्यास असून नॅशनल पब्लिक रेडिओच्या बिझनेस विभागाच्या त्या संपादक आहेत. एशियन एज या वृत्तपत्रात कार्यरत असताना एम. जे. अकबर यांनी एका हॉटेलच्या खोलीत माझ्यावर बलात्कार केल्याचा दावा पल्लवी गोगोई यांनी केला आहे. एका वृत्तपत्राच्या लेखात त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. परंतु, एम जे अकबर यांच्या वकिलांनी पल्लवी गोगई यांचा दावा फेटाळून लावला आहे.

पल्लवी गोगई यांनी म्हंटले कि, २३ वर्षाची असताना एशियन एज या आघाडीच्या वृत्तपत्रात काम करण्याची मला संधी मिळाली. मी तेथे संपादकीय विभागात कार्यरत होते. एकदा मी त्यांना संपादकीय पान दाखवण्यास गेले असता त्यांनी माझे कौतुक केले. व अचानक मला पकडून त्यांनी बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मी कशीबशी स्वतःला वाचवून त्यांच्या केबिनमधून बाहेर आले. हे काही शेवटचे नव्हते. यानंतरही अनेक वेळा माझ्यावर अतिप्रसंग ओढवला. काही महिन्यानंतर एका मॅगझीन लॉन्चिंगसाठी त्यांनी मला मुंबईत बोलवले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा हॉटेलमध्ये जबरदस्ती चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना धक्का मारून रूमबाहेर पळून गेले. या घटनेची वाचता कुठे करू नये यासाठी त्यांनी मला नोकरीवरून काढण्याची धमकी दिली होती.

एकदा मला एका बातमीसाठी जयपूरला जावे लागले. त्याठिकाणी अकबर यांनी बातमीवर चर्चा करण्यासाठी हॉटेलच्या रूममध्ये बोलवले. तिथे त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर मी काम सोडले, असे त्यांनी लेखात लिहले आहे.

दरम्यान, एम जे अकबर यांच्यावर प्रिया रमणी यांनी पहिल्यांदा आरोप लावले होते. नोकरीच्या मुलाखतीवेळी अकबर यांनी केलेल्या लैंगिक गैरवर्तवणुकीचे आरोप प्रिया रमणी यांनी केले होते. या आरोपांमुळे एम. जे. अकबर यांना परराष्ट्र राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर प्रिया रमणी व अन्य महिलांविरोधात एम. जे. अकबर यांनी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला असतानाच आता पल्लवी गोगई यांनी बलात्काराचा आरोप केल्याने अकबर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)