‘#MeToo’ अंतर्गत अमिताभ बच्चन यांचेही नाव?

भारतात #मी टू चळवळीने चांगलाच जोर धरला असून तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर अनेक महिला पुढे सरसावल्या आहेत. यामध्ये बॉलिवूडपासून ते राजकारणापर्यंत अनेक दिग्गज व्यक्तींची नावे समोर आली आहेत. यामध्ये आणखी एका प्रसिद्ध व्यक्तीचे नाव येण्याची शक्यता आहे. हेअरस्टायलिस्ट सपना भवनानी हिने अमिताभ बच्चन यांच्यावर ट्विटरवरून हल्ला चढविला आहे.

अमिताभ बच्चन यांनी ‘मी टू’ प्रकरणी लिहलेली पोस्ट रिट्विट करत सपना भवनानी म्हणाली कि, अमिताभ बच्चन यांचा खरा चेहरा लवकरच जगासमोर येईल. पिंक चित्रपट रिलीज होऊन गेला आहे आणि त्यासारखेच तुमच्या सामाजिक प्रतिभेसोबतही होणार आहे. मी खासगीरित्या अशा अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. शिवाय बच्चन यांच्या लैंगिक गैरवर्तणुकीबाबाबत अनेक कथाही वाचल्या आहेत. मी आशा करते कि, त्याही महिला जगासमोर येऊन अमिताभ बच्चन यांच्याविरोधात आवाज उठवतील, असे तिने ट्विट केले आहे. सपना भवनानी बिग बॉसच्या सहाव्या पर्वाची स्पर्धक राहिलेली आहे.

दरम्यान, ७४ व्या वाढदिवशी अमिताभ बच्चन यांनी ‘मी टू’ चळवळीवर आपले मत मांडले होते. यावेळी त्यांनी नाना पाटेकर किंवा तनुश्री दत्ता यांच्यापैकी कोणाचेही उघडपणे समर्थन केले नव्हते. तर आपण केवळ महिलांसोबत होणारी गैरवर्तवणुकीविरुद्ध असल्याचे अमिताभ बच्चन यांनी म्हंटले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)