#मी टू : अक्षय कुमारने ‘हाऊसफुल-४’चे शूटिंग केले रद्द; साजिदचीही माघार  

बॉलिवूडमध्ये  ‘#मी टू’ चळवळीअंतर्गत अनेक बडे अभिनेते आणि दिग्दर्शकांवर अत्याचाराचे आरोप होत आहे. यामध्येच पत्रकार करिष्मा उपाध्याय आणि ‘हमशक्ल’ चित्रपटामधील सहाय्यक दिग्दर्शक सलोनी चोप्रा हिनेही दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक आणि मानसिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारने साजिद खान दिग्दर्शित ‘हाऊसफुल-४’ चित्रपटाचे चित्रीकरण थांबविले आहे. यासंबंधीची माहिती अक्षयने ट्विटरवरून दिली.

अक्षय कुमार याने ट्विट करत म्हंटले कि, मी काही दिवसांपासून देशाबाहेर होतो. आजच देशात परत आलो असून मला अस्वस्थ करणारे वृत्त वाचण्यास मिळाले आहे. यामुळे मी ‘हाऊसफुल ४’च्या निर्मात्यांना तपास पूर्ण होईपर्यंत चित्रीकरण थांबविण्याची विनंती केली आहे. ही अत्यंत गंभीर बाबा असून या प्रकरणात कडक कारवाई होणे गरजेचे आहे. ज्यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप आहेत त्यांच्यासोबत मी काम करणार नाही’, असे अक्षयने ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.

तर दुसरीकडे साजिद खाननेही ट्विट करत ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटातून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्याने लिहले कि, या आरोपांमुळे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर दबाव वाढत आहे. यामुळे मी या चित्रपटाच्या दिग्दर्शक पदावरून पायउतार होत आहे. परंतु, या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून सत्य बाहेर येईपर्यंत माध्यमांनी कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू नये, अशी विनंतीही त्याने केली.

दरम्यान, लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला दिग्दर्शक सुभाष कपूर याच्या “मोगुल’ चित्रपटातून आमिर खाननेही माघार घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)