“मी टू’च्या नवीन कथा उजेडात

तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपांनंतर एकापाठोपाठ एक “तसेच’आरोप व्हायला लागले आहेत. त्यातून बॉलीवूडची काळी बाजू चव्हाट्यावर यायला लागली आहे. अनेक घडामोडींमुळे बॉलीवूड ढवळून निघाले आहे. नाना पाटेकर, विकास बहल, आलोकनाथ, कैलास खेर, वरुण ग्रोवर, अगदी खासदार एम.जे. अकबर यासारख्यांवर आरोप झाले आणि अनेक नव्या कथा समोर आल्या. यातून “मी टू’ अभियानाला कलाटणी मिळू लागली आहे.

कॉंट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंतने नानांची पाठराखण करत सेटवर घडलेला प्रकार सांगितला. यामुळे तनुश्रीच्या समर्थकांनी आपल्याला कॉल करून जीवे मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केल्याचा आरोप राखीने केला आहे. या प्रकरणात तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रारही दाखल केली आहे. नाना पाटेकर आणि मनसेची पाठराखण केल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचा दावा यावेळी तिने केला.

आता या वादामध्ये ‘स्त्री’ या चित्रपटात ‘चुडैल’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री फ्लोरा सैनी हिचाही समावेश झाला आहे. निर्माता गौरांग दोषी याच्यावर फ्लोराने गंभीर आरोप केले आहेत. तिने म्हटले की, ‘ 2007 मध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी निर्माता गौरांग दोषी याने मला मारहाण केली होती. मारहाणीमुळे माझा जबडा तुटला होता आणि फ्रॅक्‍चर झाले होते. यामुळे मला आयुष्यभराचे दुखणे मिळाले. तसेच त्याने मला धमकी दिली की मला इंडस्ट्रीमध्ये काम मिळू देणार नाही आणि खरंच तसेच झाले. अनेक चित्रपटांमधून मला बाहेरचा रस्ता दाखवून दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्यात आले, असा आरोप फ्लोराने केला आहे.

“मी टू’ अभियानानंतर “ऑल इंडिया बकचोद’ अर्थात एआयबी या युट्यूब चॅनलला ट्रोल केले जायला लागले. “एआयबी’चा लोकप्रिय चेहरा तसेच एआयबीचा सीईओ तन्मय भट याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोबतच त्याचा साथीदार गुरसिमरन खम्बानेही एआयबीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या गुरसिमरन सक्‍तीच्या रजेवर गेला आहे. तर रजत कपूरच्या सिनेमाला “मियामी’ चित्रपट महोत्सवातून माघार घ्यायला लागली आहे. आणखी काय काय होणार आहे कोणास ठाऊक ?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)