“मी टू’चळवळीवरील उपरोधिक जोक्‍सचा सोशल मीडियावर मारा

पुणे – बॉलीवूड, शिक्षणक्षेत्र, खासगी क्षेत्र याठिकाणी सोशल मीडियावरील “मी टू’च्या वादळाने अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या पोटात गोळा आणलेला असताना त्यासंबंधातील जोक्‍सने अनेकांना पोटधरून हसायलाही लावले आहे. सध्या “मी टू’ बद्दलचे जोक्‍स सोशल मिडियावर एवढे व्हायरल झाले आहेत कि, त्यासंबंधीचे गांभीर्यच संपत चालले आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

“मी टू’च्या वादळाची सुरूवात बॉलीवूडपासून झाली. याआधी अनेकदा असभ्य वर्तन, कास्टिंग काऊच या संदर्भात अभिनेत्रींनी आवाज उठवला होता. मात्र सोशल मिडियामुळे आता या गोष्टींना कमी वेळात अधिकच प्रसिद्धी मिळत आहे. त्यातीलच एक “मी टू’ चळवळ आहे. या संबंधातील बातम्या, आरोप वाचताना संबंधित अभिनेता, अभिनेत्री आणि अन्य व्यक्तींबद्दलच्या प्रतिमा खळाखळा तुटत असताना, या जोक्‍सनी त्याचे गांभीर्य हलके करण्याला सुरूवात केली आहे. त्यामध्ये चित्रपटात साकारलेल्या खलनायकांच्या नावांवरील जोक्‍स, मद्यपान, व्यंग अशा एक ना अनेक गोष्टींचा या जोक्‍समध्ये समावेश केला आहे. त्यातून “इमोजी’ देऊन त्यात आणखी रंगत आणली जात आहे.

-Ads-

केवळ फेसबुकच नव्हे तर व्हॉटस अॅप, ट्विटर यासह अनेक माध्यमातून हे जोक्‍स व्हायरल होत आहेत. यामध्ये अश्‍लील मेसेजेचाही समावेश आहे.


“रणजित, शक्ती कपूर, प्रेम चोपडा, गुलशन ग्रोव्हर और तो और अमरीश पुरी’ – यह सारे बच गए। और फसा कौन ………..आलोकनाथ’,


“Beware! Today’s ‘sweetu’ may be.. Tomorrow’s ‘Me too’ .!!……………….


जानकारी ही बचाव जनहित में जारी ।’, “मी टू’ च्या यशानंतर आणि एक चळवळ आणत आहे “पी तू’….खास त्या मित्रांसाठी जे दहा वर्षांपूर्वी एकत्र बसत पण आता मी नाही घेत असे सांगतात.’,


“बॉलीवूड के मी टू में सब फस जायेंगे बस करन जोहर बचेगा’, ” मुलांनी मी टू मोहिमेत भाग घेतला तर वावगं
वाटायला नको.


आत्ताच एक पोस्ट पाहिली. जवा नवीन पोपट हा लागला मी टू मी टू बोलायला’, ” सावध रहा… जुनी मैत्रीण पुढील काळात कधीही…”मी टू’ म्हणून बोंब मारू शकते…’,


“माझ्याबरोबरही छेडछाड होते नेहमीच – ईव्हीएम मशीन’


या आणि अशा अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. यातील काही पोस्ट अश्‍लीलतेकडे झुकणारेही आहेत. त्यामुळे तक्रार करणाऱ्यांच्या “मी टू’ चळवळीबरोबरच आता जोक्‍सची “मी टू’ चळवळही जोरात सुरू झाली आहे.

What is your reaction?
5 :thumbsup:
4 :heart:
3 :joy:
2 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)