मी जे केले, ते वाजपेयी आणि मोदींनी आधीच केले – नवज्योत सिंग सिध्दू

वाजपेयी आणि नरेंद्र मोदी माझ्या आधीच पाकिस्तानला जाऊन आले
 
नवी दिल्ली: माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला भारताचे माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते नवज्योत सिंग सिध्दू यांनी हजेरी लावली होती. 
 
शपथविधीप्रसंगी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतल्याप्रकरणी सिद्धू यांच्यावर चौफेर टीका होत आहे. भाजपने सुद्धा सिध्दू यांच्यावर टीका केली आहे.
 
दरम्यान, सिद्धू यांनी याबाबत स्पष्टीकर दिले आहे. “माझा पाकिस्तान दौरा राजकीय नव्हता. मी जे केले आहे ते अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदीं यांनी आधीच केले आहे. कारगिल युद्धानंतर वाजपेयी यांनी परवेझ मुशर्रफ यांच्याशी चर्चा केली होती. तर नरेंद्र मोदींनी अफगाणिस्तान दौऱ्यावरून परत येत असतांना लोहोरला गेले होते. कोणतेही आमंत्रण नसताना त्यांनी नवाझ शरीफ यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थिती लावली होती.”  
 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)