मी चांगले राफेल विमान बनवू शकतो…

कागदी विमान सादर करून कॉंग्रेस खासदाराने संसदेत उडवली धमाल
नवी दिली – राफेल विमान खरेदीत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करा अशी मागणी कॉंग्रेसतर्फे लोकसभेत जोरदार लावून धरण्यात आली. त्या चर्चेच्यावेळी लोकसभेतील कॉंग्रेसचे खासदार राजेश जाखर यांनी सरकारचा अभिनव पद्धतीने निषेध करताना म्हटले की राफेल तयार करण्याचे कंत्राट मला द्या मी अनिल अंबानी यांच्यापेक्षा जास्त चांगल्या पध्दतीने राफेल विमान तयार करू शकतो !. त्यावेळी त्यांनी कागदी विमानाची एक प्रतिकृतीही सादर केली त्यामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला.

राफेलचा जो गैरव्यवहार झाला आहे त्यात असाही एक आक्षेप आहे की सरकारने ही विमाने जुळवण्याचे काम अनिल अंबानी यांच्या कंपनीला दिले आहे. या कंपनीला विमाने बनवण्याचा कोणताही अनुभव नाही. या मुद्‌द्‌यावरून सरकारवर निशाणा साधताना राजेश जाखर यांनी राफेलचे कंत्राट मला द्या असे म्हणत कागदी विमानाची प्रतिकृती सभागृहात फडकाऊन या प्रकरणावर बोचरी टीका केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सभापतींनी मला सभागृहात हे विमान सादर करण्याची अनुमती द्यावी अशी विनंतीही त्यांनी केली. ते म्हणाले की हे कागदी विमान तयार करण्यासाठी मी रात्रीपासून प्रॅक्‍टीस केली आहे. आता मला अशी विमाने तयार करता येऊ लागली आहेत त्यामुळे सरकारने मला हे कंत्राट द्यावे.

राफेल विमान खरेदीत अब्जावधी रूपयांचा घोटाळा झाला आहे असा थेट आरोप कॉंग्रेस तर्फे प्रथमच लोकसभेत करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)