लंडन: भारताविरुद्ध येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या मोईन अलीने भारतीय गोलंदाजांचे कौतुक केले आहे. सध्याचा भारतीय मारा हा मी खेळलेला सर्वोत्कृष्ट गोलंदाजांचा संच आहे, अशी कबुली त्याने दिली आहे. पाचव्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या मोईन अलीने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करताना 170 चेंडूत 50 धावांची खेळी करून सलामीवीर ऍलिस्टर कूकच्या साथीत 73 धावांची भागीदारी नोंदवली.
अर्धशतक झळकावल्यानंतर इशांत शर्माच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. पहिल्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर बोलताना मोईन अली म्हणाला की, आम्ही बचावात्मक पवित्रा घेताना भारतीय गोलंदाजांना थकविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते त्याच उत्साहाने ठराविक ठिकाणी टप्पा टाकत होते. तसेच आपल्या गोलंदाजीत तोच वेग व तेच नियंत्रण राखत होते. त्यामुळे आम्हाला धावा काढणे अवघड झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)