नॉटिंगहॅम: इंग्लंडमधील कसोटी मालिकेत भारताला सलामीची समस्या भेडसावत आहे. कारण शिखर धवन, मुरली विजय आणि लोकेश राहुल हे तिन्ही सलामीवीर अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे भारतीय संघ चांगल्या सलामीवीराच्या शोधात आहे. त्याचवेळी भारताचा मर्यादित षटकांच्या संघातील सलामीवीर रोहित शर्माने भारतासाठी कसोटीमध्ये सलामीसाठी जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
रोहित म्हणाला की, मलाही कसोटी क्रिकेट खेळायला आवडले असते, पण ते माझ्या हातामध्ये नाही. संघव्यवस्थापनाने मला सलामीला जाण्याची संधी दिली, तर त्यासाठी मी सज्ज आहे. संघव्यवस्थापन जी माझ्यावर जबाबदारी सोपवू इच्छिते त्यासाठी मी तयार आहे. जर मला संधी दिली तर मी कसोटीतही सलामीला जाऊ शकतो.
इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये रोहितने चांगली कामगिरी केली होती. पण कसोटी संघात मात्र त्याला स्थान मिळवता आले नव्हते. त्यामुळे कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच तो मायदेशी परतला आहे. रोहितला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात स्थान देण्यात आले होते, पण त्यावेळी तो अपयशी ठरला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)