मीनाक्षी मल्होत्रा बनल्या मिसेस महाराष्ट्र २०१८

पुणे: मिसेस महाराष्ट्र २०१८, सिजन ३ ही सौंदर्यस्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहत पार पडली. महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, कर्हाड, मुंबई अशा कित्येक जिल्ह्यांतून स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यामध्ये उंची, व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, रॅम्पवॉक, इच्छाशक्ती, संवाद कौशल्य व परीक्षकांनी दिलेले गूण हे निकष लक्षात घेऊन या अत्यंत कठीण निवड प्रक्रियेनंतर मीनाक्षी मल्होत्रा यांनी मिसेस महाराष्ट्र २०१८ चा किताब पटकवला.
या सौंदर्य स्पर्धेमध्ये संपुर्ण महाराष्ट्रीत सौंदर्यवतींनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता, उत्तम १० स्पर्धकांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. ज्यामध्ये मीनाक्षी मल्होत्रा यांना मिसेस महाराष्ट्र ही उपाधी मिळाली . हे आयोजन रेसिडेन्सी क्लब मध्ये झाले होते.
ह्यावेळी आपले विचार व्यक्त करताना मीनाक्षी मल्होत्रा म्हणाल्या कि  “मी खरोखरच आनंदी आहे की हे स्वप्न सत्यात उतरले आहे, माझे पालक,  मित्र आणि शुभचिंतकांच्या प्रेम आणि पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. आम्हा सगळ्या मिसेसना हा उत्तम प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आयोजकांची खरोखरच ऋणी आहे”
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)