मीडियावर नियंत्रण ठेवण्याच्या तयारीत चीनची कम्युनिस्ट पार्टी

बीजिंग (चीन) – चीनची कम्युनिस्ट पार्टी मेडियावर नियंत्रण ठेवण्याच्या तयारीत असल्याचे विशेषज्ञांनी म्हटले आहे. देशातमध्ये आपले विचारधारा अधिक भक्कमपणे स्थापित करण्यासाठी आणि परदेशातील आपली प्रतिमा सुधारण्यासाठी चीनची कम्युनिस्ट पार्टी हे पाऊल उचलणार आहे. चित्रपट, टीव्हीवरील कार्यक्रमांपासून ते अगदी पुस्तके आणि रेडियोवरील कार्यक्रमांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर सरकारी नियंत्रण लागू करण्यामागे हाच हेतू असल्याचे सरळ सरळ दिसून येत आहे.

चीनमधील सार्वजनिक जीवनावर राष्ट्रपती शी जिनपिंग यांना कम्युनिस्ट पार्टीची पकड अधिक मजबूत करायची आहे. त्यादृष्टीने चायना रेडियो इंटरनॅशनल आणि चायना नॅशनल रेडियो आणि चायना सेंट्रल टेलिव्हिजन यांचे चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क या आंतरराष्ट्रीय प्रसारणाबरोबर विलीनीकरण करून व्हॉईस ऑफ चायना नावाची नवीन संस्था स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती चीनची राष्ट्रीय वृत्तसंस्था शिन्हुआने दिली आहे.

याच पद्धतीने वृत्तपत्रे आणि छपाई प्रसारक, रेडियो, फिल्म आणि टेलिव्हिजन यांच्या नियंत्रकांची जबाबदारी आणि संसाधने कम्युनिस्ट पार्टीच्या मध्यवर्ती प्रसार विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. पार्टीच्या प्रसारनीतीचे आणि आदेशांचे पालन करणे हेच या नवीन संस्थांचे काम राहणार असल्याची माहिती सरकारे वृत्तसंस्था शिन्हुआने दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)